रामदेवबाबांच्या पतंजलीला 11 लाखांचा दंड

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

न्यायाधीश ललीत नारायण मिश्रा यांनी हे आदेश दिले आहेत. पतंजली कंपनी सध्या आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्यात अग्रेसर असून, या निर्णयामुळे त्यांच्या उत्पादनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - इतर कंपन्यांच्या प्रकल्पात तयार झालेली उत्पादने आपले लेबल लाऊन विक्री केल्याने आणि त्याची चुकीच्या पद्धतीने जाहीरात केल्याने योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीला 11 लाखांचा दंड ठोठावला आहे.

हरिद्वार येथील स्थानिक न्यायालयाने रामदेवाबाबांच्या कंपनीला एक महिन्यात या रकमेची भरपाई करण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायाधीश ललीत नारायण मिश्रा यांनी हे आदेश दिले आहेत. पतंजली कंपनी सध्या आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्यात अग्रेसर असून, या निर्णयामुळे त्यांच्या उत्पादनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

याप्रकरणी जिल्हा फूड सेफ्टी विभागाने डिसेंबर 2012 मध्ये कंपनीविरोधात खटला दाखल केला होता. विभागाच्या रुद्रपुर प्रयोगशाळेतील गुणवत्ता चाचण्यांमध्ये मोहरी तेल, मीठ, बेसन आणि मधाचे नमुने अयशस्वी ठरले होते. कंपनीने फूड सिक्युरिटी नॉर्म्समधील कलम 52-53 आणि फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड(पॅकेजिंग अँड लेबलिंग) रेग्युलेशनमधील कलम 23.1(5) चा भंग केला आहे.

Web Title: Ramdev’s Patanjali Fails FSSAI Tests, Fined