दोन अपत्ये असलेल्यांना मतदानाचा हक्क नको: रामदेवबाबा

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 जानेवारी 2019

रामदेवबाबा म्हणाले, ''लोकसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन आणि त्यापेक्षा अधिक अपत्ये असलेल्यांना निवडणुकीत सहभागी होणे आणि सरकारी रुग्णालये व शाळांचा वापर नाही करू दिला पाहिजे. यामुळे आपोआप लोकसंख्या कमी होण्यास मदत होईल.''

नवी दिल्ली : दोन आणि दोनपेक्षा अधिक मुले असलेल्या कुटुंबीयांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात यावा, अशी मागणी योगगुरु रामदेवबाबा यांनी केली आहे.

रामदेवबाबांनी लोकसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. रामदेवबाबांनी दोन अपत्ये असलेल्यांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ नाही दिला पाहिजे, तसेच सरकारी नोकरीतही सहभागी करून घेतले नाही पाहिजे अशी मागणी केली आहे.

रामदेवबाबा म्हणाले, ''लोकसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन आणि त्यापेक्षा अधिक अपत्ये असलेल्यांना निवडणुकीत सहभागी होणे आणि सरकारी रुग्णालये व शाळांचा वापर नाही करू दिला पाहिजे. यामुळे आपोआप लोकसंख्या कमी होण्यास मदत होईल.''

यंदाच्या लोकसभेत कोणाचाही विजय किंवा पराभव होऊ शकतो. लोकसभेची निवडणूक जोरदार होणार असून, दोन्ही बाजूला दिग्गज असणार आहेत. राम मंदिराच्याबाबतीत जेवढ्या जोरात नागरिकांकडून आवाज उठविण्यात येत आहे, तेवढ्याच वेगाने सरकारने काम करणे गरजेचे आहे. हनुमान हा कोणत्या जातीचा आहे हे शास्त्रांमध्ये नसले तरी गुणांवरून तो ब्राह्मण असेल असे वाटते, असे रामदेवबाबांनी म्हटले आहे.

Web Title: Ramdev Baba said voting rights should be taken back for parents with more than 2 children