नेटकरी चिडले! म्हणताहेत, #रामदेव_ठग_है...

Ramdev Baba thug hai hashtag trending on social media
Ramdev Baba thug hai hashtag trending on social media

हरिद्वार : दोन दिवसांपूर्वीच हरिद्वारच्या आयुर्वेदिक आणि युनानी कार्यालयाने बाबा रामदेव यांच्या पतंजली सोबतच देशातील चाळीस टक्के आयुर्वेदिक उत्पादनं निकृष्ट दर्जाची असल्याचं म्हटलं होतं. अशातच रामदेवबाबांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी पेरियार व आंबेडकर यांच्या अनुयायांना 'वैचारिक दहशतवाद' पसरवणाऱ्या व्यक्ती म्हणले आहे.  

रामदेवबाबांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे ट्विटरवर #रामदेव_ठग_है हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. एका मुलाखती दरम्यान त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. तेव्हापासून पतंजलीच्या उत्पादनांवर बंदी घाला अशी मागणी केली जात आहे. यापूर्वी #BycottPatanjaliProducts आणि #ShutdownPatanjali हे हॅशटॅग ट्रेंडिंग होते. रामदेवबाबांच्या पतंजलीवर बहिष्कार टाका, ही उत्पादने आरोग्यासाठी चांगली नाहीत, असेही पसरवले गेले. 

'ईश्वर मानणारे मूर्ख असतात असे म्हणणारे पेरियार यांचे अनुयायी वाढत आहेत. मला बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारही पटतात पण त्यांच्या अनुयायांमध्ये देखील मूलनिवासी ही संकल्पना राबवणारे लोक आहेत. मी दलितांमध्ये भेदभाव करीत नाही. मात्र, वैचारिक दहशतवादाविरोधात देशात कायदा व्हायला हवा, अशा प्रकारचे लिखाण सोशल मीडियात व्हायला नको,' असे रामदेवबाबांनी एका मुलाखतीत म्हणले होते. त्यामुळे रामदेवबाबा सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com