भाजपनंतर आता रामदेवबाबांना राहुल गांधींचे कौतुक

ramdevbaba
ramdevbaba

नवी दिल्ली : योगगुरू रामदेवबाबांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पूर्ण समर्थन दिले होते. जागोजागी सभा घेऊन मोदींना मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले होते. पण 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रामदेवबाबा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे कौतुक करताना दिसत आहेत. त्याचबरोबर मी कोणत्याही पक्षाचा नसून अपक्ष असल्याचेही सांगत आहेत. 

रामदेवबाबांनी 2014मध्ये भाजपला समर्थन दिले होते, पण या निवडणुकीत ते भाजप व इतर कोणत्याही पक्षाला समर्थन देणार नाहीत असे त्यांनी जाहीर केले. तसेच 'मी समाजवाद व साम्यवादाला विरोध करतो' असेही त्यांनी सांगितले. ''मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, मनडो लागो मनडो लागो, मन लागो मेरा यार फकीरी में'' हा कबीरांचा दोहा सांगत त्यांनी आता मी अपक्ष आहे, कोणत्याही पक्षाला समर्थन देणार नाही असे सांगितले.

देशात चांगल्या लोकांचे सरकार हवे, 2014 मध्ये देशात राजकीय संकट होते, पण आता तसे दिसत नाही, असे म्हणत आता मी अजून काही बोलणार नाही असे वक्तव्य त्यांनी केले. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती बघून सरकारने त्यावर लक्ष द्यावे असा सल्ला रामदेवबाबांनी दिला होता. 2014 मध्ये मनमोहनसिंह यांना विरोध करणारे रामदेवबाबा आता राहुल गांधींचे कौतुक करताना दिसत आहेत.   
       

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com