पतंजलीची योगींवर नाराजी; फूड पार्क नेणार 'यूपी'बाहेर

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

फास्ट-ग्रोइंग गुड्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण म्हणाले, "आम्हाला या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही. आम्ही या औपचारिक मंजुरींसाठी बरेच दिवस प्रतीक्षा केली परंतु राज्य सरकारकडून कुठलाच प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे आता आम्ही हा प्रकल्प स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे."

लखनऊ : उत्तर प्रदेशातील यमुना महामार्गावर पतंजलीचा उभा राहणारा मेगा फूड पार्क प्रकल्प उत्तर प्रदेशातून दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय देत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर मंगळवारी (ता. 5) पतंजलीने निशाणा साधला. आचार्य बालकृष्ण म्हणाले की, 'केंद्र सरकारच्या फूड पार्क योजनेत योग्यता प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे पूर्ण करण्यास विलंब झाला, राज्य सरकारने ही परवानगी मिळावी यासाठी कोणतीही मदत केली नाही, तर आडकाठी घातली.'

 acharya balkrishna and ramdevbaba

फास्ट-ग्रोइंग गुड्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण म्हणाले, "आम्हाला या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही. आम्ही या औपचारिक मंजुरींसाठी बरेच दिवस प्रतीक्षा केली परंतु राज्य सरकारकडून कुठलाच प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे आता आम्ही हा प्रकल्प स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे."

एका वृत्तसंस्थेबरोबर बोलताना ते म्हणाले की, 'राज्य सरकारचे अधिकारी, मंत्री आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या परंतु राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे ही मंजुरी मिळू शकली नाही. कंपनीने आधीच अन्नप्रक्रियेच्या उद्योगासाठी यंत्रसामुग्री मागवली आहे, ज्यामुळे उत्तर प्रदेशातील लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल आणि लोकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.'

केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या मते, दिल्लीजवळील गौतमबुद्धनगरमधील खाद्य व हर्बल पार्कला यावर्षी जानेवारीमध्ये कागदोपत्री मान्यता देण्यात आली. परंतु कंपनीला जमीनीचा ताबा आणि बँक कर्जाच्या कागदपत्रांसह चार ते पाच अटी पूर्ण करणे आवश्यक होते. केंद्रीय खाद्यप्रक्रिया विभागाच्या प्रमुख जे.पी. मीना म्हणाल्या, "आम्ही पतंजलीला एक महिन्याचा कालावधी दिला आहे. त्यांना या अटी पूर्ण कराव्या लागतील. पतंजली या अटी पूर्ण करण्यास सक्षम नसल्यास हा प्रकल्प रद्द करण्याशिवाय आमच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहणार नाही. कंपनीकडे या महिना अखेरपर्यंत वेळ आहे."

आचार्य बालकृष्ण म्हणाले, उत्तर प्रदेशातील ही कंपनी रद्द केल्यास केंद्र आणि राज्यांमध्ये सत्ता गाजवत असलेल्या भाजपासाठी ही लज्जास्पद बाब असेल. 

बाबा रामदेव यांनी आचार्य बाळकृष्ण यांच्या सहकार्याने या कंपनीची स्थापना केली होती. बाबा रामदेव अजूनतरी या विषयावर काही बोलले नाही.
परंतु 98.6 टक्के शेअर्स हे आचार्य बालकृष्ण यांच्या खासगी मालकीचे आहेत. त्यांनी राजकीयदृष्ट्या चांगले संबंध असलेल्या योगगुरु रामदेव बाबांना या कंपनीत सामावून घेतले. फोर्ब्ज अरबपतिंच्या यादीत, आचार्य बालकृष्ण जगातील 274वे सर्वांत श्रीमंत आणि 19वे श्रीमंत भारतीय आहेत. त्यांची मालमत्ता साधारण 6.3 अब्ज डॉलर्स आहे.

Web Title: Ramdevs Patanjali To Shift Food Park From UP denial of proposal by up government