"सीबीआयसी'च्या अध्यक्षपदी रमेश

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाच्या (सीबीआयसी) अध्यक्षपदी ज्येष्ठ अधिकारी एस. रमेश यांची नियुक्ती करण्यात आली. अप्रत्यक्ष करांबाबत धोरण ठरविणारी "सीबीआयसी' ही सर्वोच्च संस्था सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यमान अध्यक्षा वनजा एस. सरना यांची जागा आता रमेश घेतील.
 

नवी दिल्ली : केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाच्या (सीबीआयसी) अध्यक्षपदी ज्येष्ठ अधिकारी एस. रमेश यांची नियुक्ती करण्यात आली. अप्रत्यक्ष करांबाबत धोरण ठरविणारी "सीबीआयसी' ही सर्वोच्च संस्था सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यमान अध्यक्षा वनजा एस. सरना यांची जागा आता रमेश घेतील.

सरना यांची वस्तू व सेवाकर नेटवर्कच्या (जीएसटीएन) अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्‍यता आहे. रमेश हे भारतीय महसूल सेवेच्या 1981 च्या तुकडीचे अधिकारी आहेत. सध्या ते "सीबीआयसी'चे सदस्य आहेत. त्यांच्यावर वस्तू व सेवाकराची (जीएसटी) अंमलबजावणी करण्याची जबाबदारी होती. त्यांची "सीबीआयसी'च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने त्यांना विशेष सचिवांचा दर्जा मिळणार आहे. 

रमेश यांच्या जागी आता ज्येष्ठ अधिकारी राज कुमार बारथवाल यांची "सीबीआयसी'च्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. "सीबीआयसी' ही अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत असून, अध्यक्षांसह सहा सदस्यांचा या मंडळात समावेश असतो. 

Web Title: Ramesh as the new chairman of the CBIC