रमेश तवडकर भाजप की काँग्रेसच्या दिशेने?

panji
panji

पणजी - विधानसभेच्या गेल्या वर्षीच्या निवडणुकीत काणकोणमधून भाजपने उमेदवारी नाकारलेल्या माजी मंत्री रमेश तवडकर यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप आणि कॉंग्रेसमध्ये चुरस सुरु झाली आहे. तवडकर यांनी आपला राजकीय निर्णय घेतलेला नसला तरी लोकसभेची निवडणूक लढण्यास ते इच्छूक आहेत. त्यांनी भाजपमध्ये यावे यासाठी खुद्द मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर त्यांच्याशी बोलले असून कॉंग्रेसकडून एका माजी मुख्यमंत्र्याने तवडकर यांची भेट घेऊन लोकसभेच्या उमेदवारी स्वीकारण्याची गळ त्यांना घातली .गेले १५ दिवस अत्यंत शिस्तबद्धरीत्या हे प्रयत्न सुरु आहेत. तवडकर यांच्या संस्थेने आयोजित केलेल्या लोकोत्सवाच्या निमित्ताने त्यांचा लोकसंग्रह सर्वांसमोर आला आणि त्यांना आपल्याकडे वळण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली आहे. गावडा, कुणबी आणि वेळीप समाजात असलेले तवडकर यांचे स्थान पाहता असा लोकनेता आपल्या पक्षात असावा असे प्रत्येकाला वाटणे साहजिक आहे. त्यासाठीच हा प्रयत्न करण्यात येत आहे.

भाजपकडून मुद्दामहून तवडकर यांच्या संपर्कात असलेल्या परंतु सध्या राज्यात नसलेल्या एका नेत्याकडे त्यांचे मन वळवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. भाजपमध्ये एक मुख्यमंत्री व दुसरा तो नेता अशांवरच आपला विश्वास असल्याचे तवडकर यांनी म्हटले होते. त्याचा धागा पकडत ही जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली होती. त्याने ती पार पाडताना मुख्ममंत्री पर्रीकर यांच्या खासगी निवासस्थानी तवडकर त्यांना भेटण्याची व्यवस्था केली मात्र आपल्या संघटनकौशल्याची आपण सोडला तर कुणाला कदर तरी आहे का या तवडकर यांच्या प्रश्नावर मुख्यममंत्र्यांनी उत्तर दिले नाही अशी माहिती मिळाली आहे.

यांच्या प्रश्नावर मुख्यममंत्र्यांनी उत्तर दिले नाही अशी माहिती मिळाली आहे.
लोकोत्सवाच्या उद्‌घाटन सोहळ्यास केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आमदार इजिदोर फर्नांडिस, समारोपाला सभापती डॉ. प्रमोद सावंत, मध्यल्या सत्राला माजी मंत्री महादेव नाईक, माजी आमदार गणेश गावकर, माजी आमदार सुभाष नाईक आणि कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांना एकत्र आणून तवडकर यांनी राजकीय क्षेत्रातही आपण अद्याप संपर्क ठेऊन असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे तवडकर यांनी कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्याच पक्षात यावे यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.

कॉंग्रेसच्या एका माजी मुख्यमंत्र्याने, राज्यातील जबाबदार पदाधिकाऱ्यासह तवडकर यांची भेट घेतली. त्या भेटीत तवडकर यांनी आपण लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे सांगितले. त्यानंतर तवड़कर यांना कॉंग्रेसकडून दक्षिण गोवा लोकसभा उमेदवारी स्वीकाराल काय अशी थेट विचारणा करण्यात आली. त्यावर काही दिवसात निर्णय कळवतो असे सांगून त्यांनी विषय़ थांबवला आहे. मात्र तवडकर यांच्याशी भाजप नेत्यांनी वाढवलेला संपर्क नजरेत येऊ लागल्याने येत्या काही दिवसात मोठी घडामोड दक्षिण गोव्याच्या राजकीय क्षितिजावर अपेक्षित मानली जात आहे.

याबाबत रमेश तवडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट झाल्याचे मान्य केले. ते म्हणाले, त्यांच्याकडून बोलावणे आले. ते आजारी असल्याने मन दुखावणे बरे वाटले नाही म्हणून भेट घेतली.

सचे नेतेही भेटायला आले होते. लोकोत्सव आयोजनाच्या निमित्ताने मी सामाजिक हेतूने लोकसंपर्क केला होता. आता राजकीय हेतूने एक लोकसंपर्काची फेरी करणार आहे. त्यानंतरच माझा राजकीय निर्णय घेणार आहे. मी पक्षात यावे यासाठी भाजप आणि कॉंग्रेसचे नेते माझ्या संपर्कात आहे हे खरे आहे. मात्र त्याचा तपशील आताच देऊ शकत नाही. योग्यवेळी मी राजकीय निर्णय जाहीर करेन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com