रामगोपाल यादवांची पुन्हा 'सप'तून हकालपट्टी

वृत्तसंस्था
रविवार, 1 जानेवारी 2017

रामगोपाल यादव आणि अखिलेश यादव यांचे सहा वर्षांचे निलंबन मागे घेतल्यानंतर आज (रविवार) दुसऱ्याच दिवशी असंविधानिकरित्या पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन बोलविल्याबद्दल मुलायमसिंह यांनी त्यांचे पाच वर्षांसाठी निलंबन केले.

लखनऊ - समाजवादी पक्षाची (सप) राष्ट्रीय कार्यकारिणी पार पडल्यानंतर काही वेळातच सपचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी रामगोपाल यादव यांची पुन्हा एकदा पाच वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली.

रामगोपाल यादव आणि अखिलेश यादव यांचे सहा वर्षांचे निलंबन मागे घेतल्यानंतर आज (रविवार) दुसऱ्याच दिवशी असंविधानिकरित्या पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन बोलविल्याबद्दल मुलायमसिंह यांनी त्यांचे पाच वर्षांसाठी निलंबन केले. तसेच 5 जानेवारीला राष्ट्रीय अधिवेशन बोलविण्यात येणार असल्याचे, मुलायमसिंह यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील यादव कुटुंबातील कलह अद्याप संपण्याच्या मार्गावर नाही.

यापूर्वी आज सकाळी अखिलेश यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांना पदावरून हटविण्यात आले. तर, समाजवादी पक्षातील कलहाला जबाबदार धरण्यात येणाऱ्या अमरसिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मुलायमसिंह यांना पक्षाचे मार्गदर्शक बनविण्यात आले होते.

Web Title: Ramgopal Yadav’s second expulsion in three days