अधिकाऱ्यांनी संपावर जाणे हे नियमांचे उल्लंघन नाही का ?

वृत्तसंस्था
सोमवार, 18 जून 2018

मनिष सिसोदिया यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांची रुग्णालयात जाऊन समाजवादी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार रामगोपाल यादव यांनी भेट घेतली आहे. तसेच, त्यांच्या प्रकृतीची चौकशीही केली आहे. यावेळी आएएस अधिकाऱ्यांनी संपावर जाणे म्हणजे नियमांचे उल्लंघन नाही का ? असा प्रश्न केला आहे

नवी दिल्ली - मनिष सिसोदिया यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांची रुग्णालयात जाऊन समाजवादी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार रामगोपाल यादव यांनी भेट घेतली आहे. तसेच, त्यांच्या प्रकृतीची चौकशीही केली आहे. यावेळी आएएस अधिकाऱ्यांनी संपावर जाणे म्हणजे नियमांचे उल्लंघन नाही का ? असा प्रश्न केला आहे. लोकशाहीच्या इतिहासात प्रशासकिय सेवेतील अधिकाऱ्यांनी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ असेल. असेही, त्यांनी यावेळी म्हटले आहे.

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराज्यपाल यांनी विनंती करेन की, या विषयावर त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत बोलून तोडगा काढावा, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यादरम्यान, भारतिय कम्युनिष्ट पक्षाचे नेते राज्यसभा खासदार डी. राजा यांनीही रुग्णालयात भेट देऊन मनिष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.

Web Title: ramgopal yadav statement on delihi political crisis