Amritsar Train Accident : रावणाची भूमिका करणाराच रेल्वेखाली ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

अमृतसर : अमृतसरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात त्या ठिकाणी चालू असलेल्या रामलिला कार्यक्रमातील रावणाची भूमिका करणाऱ्या कलाकाराचाही मृत्यू झाला आहे. दलबीर असे त्याचे नाव असून त्याचाही रेल्वेखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. रावणदहनाच्या कार्यक्रमावेळी दलबीरही रेल्वे रूळावर उभा होता. 

काल (ता. 19) झालेल्या रेल्वेच्या या भीषण अपघातात 61 लोकांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला. यात रावणाची भूमिका करणाऱ्या दलबीरचाही समावेश होता. गेली अनेक वर्ष दलबीर रामलिलामध्ये रावणाची भूमिका करत होता. पण, हा कार्यक्रम त्याचा शेवटचा ठरला.    

दलबीरच्या मागे पत्नी, 8 महिन्याचे बाळ, आई व भाऊ आहेत. दलबीरच्या आईने सरकारकडे त्याच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याची मागणी केली आहे. तसेच या दुर्घटनेसाठी त्यांनी स्थानिक प्रशासनाला जबाबदार ठरविले आहे. स्थानिक प्रशासन लोकांना रेल्वे येणार असल्याची पूर्वकल्पना देण्यात अपयशी ठरले, असे दलबीरच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.

Web Title: Ramlila Actor Dies in Amritsar Train Tragedy