स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू रामपालला आणखी एका गुन्ह्यात जन्मठेप 

वृत्तसंस्था
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

कोण आहे रामपाल? 
रामपालसिंग जतीन (वय 67) असे बाबा रामपालचे मूळ नाव आहे. हरियानाच्या पाटबंधारे खात्यात त्याने काही काळ नोकरीही केली होती. नंतर कबीर पंथ स्वीकारत त्याने हरियाना, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मोठा भक्तवर्ग निर्माण केला होता. अखिल भारतीय आखाडा परिषद या हिंदू साधू-संतांच्या सर्वोच्च संघटनेने भोंदू साधूंच्या यादीत रामपालचे नाव टाकले होते. 

हिस्सार (हरियाना) : खुनाच्या दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरविलेला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू रामपाल याला आज (बुधवार) दुसऱ्या गुन्ह्यातही जन्मेठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली. 

रामपालला हिसार न्यायालयाने नुकतीच एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आज त्याला दुसऱ्या गुन्ह्यातही जन्मठेपेसह एक लाखांचा दंड भरण्याची शिक्षा सुनाविण्यात आली. रामपाल आणि त्याच्या समर्थकांविरोधात नोव्हेंबर 2014 मध्ये खुनाचे दोन गुन्हे दाखल झाले होते. आपल्या पत्नीचा रामपालच्या सतपाल आश्रमात खून करण्यात आल्याचा आरोप करत दोघा जणांनी पोलिसांकडे स्वतंत्रपणे तक्रार नोंदविली होती. 

याप्रकरणी न्यायालयाने रामपालला गेल्या आठवड्यात दोषी ठरविले होते. आज शिक्षेची सुनावणी करताना न्यायालयाने रामपालला जन्मठेप सुनावली. यामुळे धर्माच्या पडद्याआड अधर्म करत भोळसट भाविकांची फसवणूक करणाऱ्या बाबामंडळींना झटका बसला आहे.

कोण आहे रामपाल? 
रामपालसिंग जतीन (वय 67) असे बाबा रामपालचे मूळ नाव आहे. हरियानाच्या पाटबंधारे खात्यात त्याने काही काळ नोकरीही केली होती. नंतर कबीर पंथ स्वीकारत त्याने हरियाना, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मोठा भक्तवर्ग निर्माण केला होता. अखिल भारतीय आखाडा परिषद या हिंदू साधू-संतांच्या सर्वोच्च संघटनेने भोंदू साधूंच्या यादीत रामपालचे नाव टाकले होते. 

Web Title: Rampal sentenced to life imprisonment for killing woman