श्‍वसनाच्या त्रासामुळे रामविलास पासवान ICU मध्ये!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

पाटना (बिहार) : श्‍वसनाचा त्रास होत असल्याचे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना एका खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

केंद्रीय अन्न पुरवठा आणि सार्वजनिक वितरण मंत्री पासवान यांना गुरुवारी पाटना येथील पारस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत त्यांच्या खाजगी सचिवाने माहिती दिली आहे. बिहारमधील काही राजकीय कार्यक्रमांसाठी पासवान हे चार दिवसांच्या बिहार दौऱ्यावर होते. मकरसंक्रांतीनिमित्त होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमातही ते उपस्थित राहणार होते. मात्र, गुरुवारी रात्री त्यांना अचानक श्‍वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष हा केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत आहे. लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष असलेले पासवान यांनी  आठ वेळा लोकसभेचे सदस्यपद भूषविले आहे. ते राज्यसभेचे माजी सदस्यही होते.

Web Title: Ramvilas Paswan admitted to ICU following complaints of breathlessness