Rafale Deal : मोदीजी, लवकरच सत्य समोर येईल : सुरजेवाला

वृत्तसंस्था
बुधवार, 10 एप्रिल 2019

मोदीजी, तुम्हाला जितकं पळायचंय, खोटं बोलायचंय बोलू शकता. मात्र, आज नाहीतर उद्या सत्य समोर येणार आहे.

- रणदीपसिंह सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते

नवी दिल्ली : राफेल गैरव्यवहारावरून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, मोदीजी, तुम्हाला जितकं पळायचंय, खोटं बोलायचंय बोलू शकता. मात्र, आज नाहीतर उद्या सत्य समोर येणार आहे. तसेच आता राफेल प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे, असेही ते म्हणाले. 

राफेल गैरव्यवहारप्रकरणी मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला. त्यानंतर यावरून सुरजेवाला म्हणाले, मोदीजी, तुम्ही जितके खोटे बोलू शकता तेवढे बोला. तसेच जेव्हा पळायचं असेल तर पळा. याबाबत आज नाहीतर उद्या सत्य समोर येणार आहे. राफेल गैरव्यवहारातील एक-एक प्रकरण समोर येत आहेत. आता तुमच्याकडे लपण्यासाठी कोणताही गुप्त कायदा नाही. तसेच आता त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं उघड करणाऱ्या मुक्त पत्रकारांबाबत त्यांना भीती आहे, असे सुरजेवाला म्हणाले.

Web Title: Randeep Surjewala Criticizes Narendra Modi on Rafale Issue