Video : मुरलीधर यांच्या बदलीवरून सुरजेवाला यांची भाजपवर टीका; म्हणाले...

टीम ई-सकाळ
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

- भाजपकडून न्यायव्यवस्थेवर एकप्रकारे दबाव टाकला जातोय...

नवी दिल्ली : भाजपकडून न्यायव्यवस्थेवर एकप्रकारे दबाव टाकला जात आहे. मात्र, हे काही नवे नाही. यापूर्वीही त्यांनी अशाप्रकारे अनेकदा केले आहे. भाजप अद्यापही 2019 च्या धुंदीत आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज (गुरुवार) टीकास्त्र सोडले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीतील हिंसाचारावरून केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या दिल्ली पोलिसांना फटकारणारे दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीश एस. मुरलीधर यांची रात्रीतच पंजाबमध्ये बदली करण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात सुरजेवाला यांनी भाष्य केले. ते म्हणाले, भाजपकडून न्यायव्यवस्थेवर दबाव टाकला जात आहे. मात्र, हे काही नवे नाही. यापूर्वीही त्यांनी अशाप्रकारे अनेकदा केले आहे. उत्तराखंडमध्येही मोदी सरकारने दबाव टाकला होता. 

तसेच अमित शहा यांना तुरुंगात पाठविणाऱ्या न्यायाधीशांची बदली करण्यात आली आहे. हे काही नवे प्रकरण नाही. यांसारखे अनेक प्रकरणं घडल्याचे समोर आले आहे. न्यायालयाकडून जे काही विरोधात निर्णय दिले जातात. त्यानंतर न्यायाधीशांची बदली केली जाते. 

...म्हणून झाली बदली

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि एनआरसी या मुद्द्यावरुन दिल्लीत झालेल्या हिंसाचारात 29 जणांचा मृत्यू झाला असून, शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Randeep Surjewala talked about justice muralidhar transfer