राम रहीमच्या सूचनेवरून रणजित सिंगचा खून

पीटीआय
गुरुवार, 10 मे 2018

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमित राम रहीम सिंग याच्या सांगण्यावरून त्याच्या काही अनुयायायांचा खून करण्यात आल्याचे राम रहीम सिंग याचा चालक खट्टा सिंग याने पंचकुला येथील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयास सांगितले.
 

चंडीगड - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमित राम रहीम सिंग याच्या सांगण्यावरून त्याच्या काही अनुयायायांचा खून करण्यात आल्याचे राम रहीम सिंग याचा चालक खट्टा सिंग याने पंचकुला येथील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयास सांगितले.

डेराचा अनुयायी रणजितसिंग याच्या खूनप्रकरणी खट्टा सिंग याची सुनावणी झाली. त्या वेळी त्याच्या वतीने ऍड. नवकिरण सिंग यांनी ही माहिती दिली. राम रहीम सिंग याला दोन महिलांच्या बलात्काकरप्रकरणी 20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. खट्टा सिंग याने दिलेल्या त्याच्या जबाबात राम रहीम यानेच रणजित सिंग याला मारण्याची सूचना केली होती, असे म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 मे रोजी होणार आहे. 
 

Web Title: Ranjit Singh's murder on the order of Ram Rahim