Video : बस्स! नशिबचं बदललं; मुलगीही मिळाली...

वृत्तसंस्था
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

रानू मारिया मंडाल यांचा गाणे गाताना व्हिडिओ व्हायरल झाला अन् त्यांचे नशिबचं बदललं. प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी त्यांची मुलगी त्यांना मिळाली आहे.

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या कोलकाता रेल्वे जंक्शन मार्गावरील रानाघाट रेल्वे स्थानकावर गाणे गात उदरनिर्वाह करणाऱया रानू मारिया मंडाल यांचा गाणे गाताना व्हिडिओ व्हायरल झाला अन् त्यांचे नशिबचं बदललं. प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी त्यांची मुलगी त्यांना मिळाली आहे.

रानू मंडल या त्यांच्या मुलीपासून तब्बल 10 वर्ष दूर राहिल्या होत्या. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ व बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळताच त्यांची मुलगी त्यांच्याकडे आली आहे. मुलगी परत आल्यामुळे आनंद झाला असून, माझ्या दूसऱ्या आयुष्याला सुरुवात झाली आहे, असे रानू यांनी सांगितले. सोशल मीडियावर रानू व त्यांच्या मुलीचे छायाचित्र व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. गायिका लता मंगेशकर यांच्या आवाजातील गाणे रेल्वे स्टेशनवर गायल्यानंतर रानू यांचे आयुष्यच बददले आहे.

रानू यांचा बाबू मंडल यांच्याशी विवाह झाला होता. मात्र, पतीच्या निधनानंतर त्या रेल्वे स्थानकावर गाणे गाऊन उदरनिर्वाह करत होत्या. लता मंगेशकर यांच्या आवाजातील 'एक प्यार का नगमा है...' हे गाणे गात असताना एका व्यक्तिने व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. संबंधित व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की, रानू एका रात्रीत स्टार झाल्या. बॉलिवूडसाठी त्यांनी पहिले गाणे रेकॉर्ड केले आहे. हिमेशच्या 'हॅपी हार्डी और हिर' या चित्रपटात 'तेरी मेरी कहानी...' हे गाणे गायले आहे. या गाण्याला हिमेशने सुद्धा आवाज दिला आहे. रानू आणि हिमेशचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ranu Mandal meet her Daughter After 10 years