बलात्काराच्या बदल्यात बॉलिवूड खायला देते : सरोज खान

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 एप्रिल 2018

''बलात्कार करून फिल्म इंडस्ट्री सोडून देत नाही. तर निदान त्या बदल्यात खायला तरी देते. मात्र, असे करताना हे संपूर्ण त्या मुलीवर आधारित आहे, की काय करायचे अशी तिची इच्छा आहे. कोणासोबत जावे किंवा नाही हे त्यांनी ठरवायला हवे''.

-  सरोज खान, नृत्यदिग्दर्शिका

नवी दिल्ली : सध्या बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचबाबत अनेक अभिनेत्री पुढे येऊन बोलत आहेत. त्यानंतर नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी याबाबत वादग्रस्त विधान केले. त्या म्हणाल्या, ''कास्टिंग काऊच होणे ही नवीन बाब नाही. हे बाबा आदम यांच्या पिढीपासून सुरु आहे. बॉलिवूड बलात्कार करून सोडून देत नाही तर त्या बदल्यात बॉलिवूड खायला देते''.

Saroj Khan

कास्टिंग काऊचची अनेक प्रकरणे सध्या समोर येत आहेत. यावर सरोज खान म्हणाल्या, प्रत्येक मुलीवर कास्टिंग काऊचसारखा प्रकार करण्याचा कोणीतरी प्रयत्न करत असतो. कास्टिंग काऊच होणे ही नवीन बाब नाही. हे बाबा आदम यांच्या पिढीपासून सुरु आहे. सरकारमधील लोक असा प्रकार करतात तर इतर सर्व फिल्म इंडस्ट्रीतील लोकांच्या मागे का लागला आहात. बलात्कार करून फिल्म इंडस्ट्री सोडून देत नाही. तर निदान त्या बदल्यात खायला तरी देते. मात्र, असे करताना हे संपूर्ण त्या मुलीवर आधारित आहे, की काय करायचे अशी तिची इच्छा आहे. कोणासोबत जावे किंवा नाही हे त्यांनी ठरवायला हवे. 

''जर तुमच्याकडे कला असेल, तर तुम्ही स्वत:ला विकणार का, असा सवाल करत त्या पुढे म्हणाल्या, फिल्म इंडस्ट्रीबाबत काहीही सांगू नका. बॉलिवूड इंडस्ट्री आमचे माय-बाप आहेत''.

दरम्यान, सरोज खान यांच्या या वादग्रस्त विधानावरून नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.   

Web Title: Rape Case Casting Couch Saroj Khan Statement About Casting Couch In Film Industry