मिथुनच्या मुलाविरुद्ध बलात्काराची तक्रार

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जुलै 2018

नवी दिल्ली - मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाक्षय याच्या विरोधात बलात्कार आणि जबरदस्तीने गर्भपात करायला लावण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

या गुन्ह्यात मिथुन चक्रवर्ती यांची पत्नी योगिता बाली यांनाही सहआरोपी करत त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. महाक्षय याचा सात जुलै रोजी विवाह आहे. 

बेगमपुरा पोलिस ठाण्यात या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पीडिता ही भोजपुरी चित्रपटातील अभिनेत्री असल्याचे सांगितले जाते. 

महाक्षयने विवाहाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केले आणि आता मात्र तो दुसऱ्या मुलीसोबत विवाह करत आहे, अशी पीडितेची तक्रार आहे.

Web Title: Rape Case Crime Mahaakshay Chakraborty