नोकरीच्या बहाण्याने मुलीवर बलात्कार

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जुलै 2018

नोकरी देण्याच्या बहाण्याने एका 19 वर्षीय मुलीवर चार जणांनी येथील जंगलात सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती आज पोलिसांनी दिली. पीडित मुलीला नोकरीचे आश्‍वासन देणाऱ्यांपैकी एका पुरुषाला आणि महिलेला अटक करण्यात आली आहे, असे कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रमुख एम. एस. परमार यांनी सांगितले.

देवास : नोकरी देण्याच्या बहाण्याने एका 19 वर्षीय मुलीवर चार जणांनी येथील जंगलात सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती आज पोलिसांनी दिली. पीडित मुलीला नोकरीचे आश्‍वासन देणाऱ्यांपैकी एका पुरुषाला आणि महिलेला अटक करण्यात आली आहे, असे कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रमुख एम. एस. परमार यांनी सांगितले.

पीडित मुलगी खारगोने जिल्ह्यातून सोमवारी रात्री साडेनऊला देवासला गेली. त्यानंतर तिने महिलेला फोन केल्यावर मनोज ऊिर्फ सनी गुर्जर हा तिला नेण्यासाठी आला, असे त्यांनी सांगितले. गुर्जरने तिला निर्जनस्थळी नेले तेथे त्याचे तीन साथीदार होते. त्यांनी पीडित मुलीला झाडाला बांधले आणि बलात्कार केला. गाड्यांचे दिवे दिसताच आरोपी पीडित मुलीला जागेवरच सोडून पळून गेले. 

Web Title: rape on girl To show jobs greed