मुनींवरील बलात्काराचा आरोप खोटा

महेश शहा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

खोलीमध्ये आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप पीडित मुलीने केला त्याला लागून असणाऱ्या खोलीमध्ये तिचे आई-वडील तेव्हा बसलेले होते. अशा स्थितीमध्ये येथे मुलीवर बलात्कार केला जाऊ शकत नाही, असा दावा शहा यांनी केला

अहमदाबाद - येथे जैन मुनींवर झालेले बलात्काराचे आरोप हे मोठे कारस्थान असल्याचा आरोप जैन समाजाच्या प्रतिनिधींनी केला आहे. मूळची मध्य प्रदेशची रहिवासी असलेल्या 19 वर्षांच्या मुलीवर आचार्य शांतीसागर महाराज या जैन मुनीने बलात्कार केल्याचे उघड झाल्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली होती. 1 आक्‍टोबर रोजी सुरतेत आपल्यावर बलात्कार झाल्याचे पीडित मुलीने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले होते.

जैन मुनींचे वकील आर. जी. शहा यांनी आज समाजातील काही बड्या नेत्यांसोबत महावीर दिगंबर जैन मंदिरामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
ज्या ठिकाणी आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप पीडित मुलीने केला, त्या उपाश्रय ठिकाणावरही माध्यमांच्या प्रतिनिधींना नेण्यात आले. ज्या खोलीमध्ये आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप पीडित मुलीने केला त्याला लागून असणाऱ्या खोलीमध्ये तिचे आई-वडील तेव्हा बसलेले होते. अशा स्थितीमध्ये येथे मुलीवर बलात्कार केला जाऊ शकत नाही, असा दावा शहा यांनी केला. शांतीसागर महाराज यांची चार वेळेस पौरुषत्व चाचणी घेण्यात आली असता त्यातून काही हाती लागलेले नाही. पीडित मुलीवर खरोखरच अत्याचार झाला होता, तर तक्रार नोंदविण्यासाठी बारा दिवसांचा वेळ का लागला, असा सवालही शहा यांनी केला.

Web Title: rape jain guru