प्रेयसी म्हणाली, माझ्यासमोर तू बलात्कार करत राहा...

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जुलै 2019

घरा शेजारी राहणाऱया युवतीवर प्रियकराला बलात्कार करण्यासाठी प्रेयसीने भाग पाडल्याची घटना घडली आहे.

गाझियाबादः घरा शेजारी राहणाऱया युवतीवर प्रियकराला बलात्कार करण्यासाठी प्रेयसीने भाग पाडल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. यावेळी प्रेयसीने तिच्या समोर बलात्कार करायला लावले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घडली आहे. शेजारी राहणाऱ्या तरुणीने तिच्या प्रियकराकडून हा बलात्कार घडवून आणला. 18 जुलै रोजी मुरादनगर परिसरात ही घटना घडली आहे. पीडित मुलीने आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी ब्युटिशिअनचं शिक्षण घेत असून, 18 जुलै रोजी आपले फेशिअल करायचे सांगून शेजारील तरुणीने तिला घरी बोलावले. यावेळी तिचा प्रियकर रॉबिन हा घरामध्येच होता. पीडित मुलीला त्यांनी गुंगीचे औषध मिसळलेलं पेय पिण्यास दिले. यानंतर रॉबिन बलात्कार करण्याचा प्रयत्न करू लागला. त्याची प्रेयसी व युवकाने मला मारहाण केली. रॉबिनच्या प्रेयसीसमोरच माझ्यावर बलात्कार करण्यात आला. बलात्कारासाठी तिने त्याला मदत केली. शिवाय, याबद्दल कोणाला माहिती सांगितली तर संपूर्ण कुटुंबाची हत्या करेन, अशी धमकी सुद्धा दिली, अशी माहिती पीडीत मुलीने पोलिसांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rape by neighour boyfriend in uttar pradesh