रेप तो चलतेही रहेते है: रेणुका चौधरी

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - केंद्रातील भाजप सरकार सदस्यांच्या वादग्रस्त वक्‍तव्याने कायम अडचणीत येत असल्याचे दिसत असते. पण आता विरोधी कॉंग्रेस पक्षाला ज्येष्ठ नेत्या रेणुका चौधरी यांनी अडचणीत आणले आहे. बुलंदशहरमध्ये नुकत्याच झालेल्या सामूहिक बलात्कारासारख्या प्रकरणावर बोलताना "रेप तो चलतेही रहते है,‘ अशा शब्दांत त्यांनी या गंभीर विषयाची खिल्ली उडविली.

चौधरी यांचे हे वादग्रस्त वक्तव्य कॉंग्रेसला उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भोवण्याची शक्‍यता व्यक्‍त होत आहे. या बलात्कारप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, ""बलात्कार तर होतच असतात. या घटनेच्या 10-12 दिवसांनी त्यांनी कोणाला अटक केली आणि त्याबद्दल त्यांना शाबासकी मिळेल असे वाटत असेल तर असे काहीही होणार नाही.‘‘

""आता पोलिस तपास किंवा अन्य काही असो; त्याला उशीर झाला आहे. आता पुढे काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण रोज सकाळी उठलो की आपल्याला कुणीतरी बलात्काराबाबत बोलताना ऐकू येते. याचा आता उबग आला आहे,‘‘ असेही चौधरी म्हणाल्या.

Web Title: Rape is on the ring: Renuka Chowdhury