सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ घेऊन 'ती' गेली पोलिसांकडे

Rape Survivor Reaches Police Station With Viral Video Clip in Meerut As Investigation Gets Delayed
Rape Survivor Reaches Police Station With Viral Video Clip in Meerut As Investigation Gets Delayed

मेरठ (उत्तर प्रदेश): एका 25 वर्षीय युवतीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. बलात्कार करताना त्यांनी व्हिडिओमध्ये शूट केले. बलात्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिस काहीच करत नसल्यामुळी पीडित युवतीने स्वताःवरील बलात्काराचा व्हिडिओ घेऊन पोलिस चौकी गाठत आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, 'मेरठ येथे 17 फेब्रुवारीला अनीस, शादाब व फरियाद या तिघांनी मिळून सामूहिक बलात्कार केला. बलात्कार होत असतानाचा व्हिडीओ काढला. शिवाय, पोलिसांकडे गेल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली. पण, त्यांच्या धमकीला न जुमानता पोलिसांकडे धाव घेतली आणि आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. सामूहिक बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल होण्याआधी कारवाई करावी, अशी मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. बलात्कारानंतर अनेकदा पोलिस ठाण्यात जाऊनही दुर्लक्ष करण्यात आले. पोलिसांकडे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपींनी बलात्काराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. यानंतर सामूहिक बलात्काराचा व्हिडीओ घेऊनच मी पोलिसांकडे गेले.'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनीस अन्सारी, शादाब आणि फरियाद या तिघांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. परंतु, पीडित युवतीच्या इच्छेनुसार संबंधित प्रकरण गुन्हे विभागाकडे सोपवण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक अविनाश पांडे यांनी आपण याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करत आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com