राजधानीत पुन्हा 'त्याच' दिवशी बलात्कार

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

नवी दिल्लीः राजधानीत 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर बसमध्ये सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जग हादरून गेले होते. मात्र, रविवारी (ता. 16) म्हणजे 16 डिसेंबर रोजी एका तीन वर्षांची मुलगी बलात्काराची शिकार बनली.

नवी दिल्लीः राजधानीत 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर बसमध्ये सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जग हादरून गेले होते. मात्र, रविवारी (ता. 16) म्हणजे 16 डिसेंबर रोजी एका तीन वर्षांची मुलगी बलात्काराची शिकार बनली.

पोलिस व स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तीन वर्षांची मुलगी तिच्या घराबाहेर खेळत होती. यावेळी एकाने मिठाई देण्याचे आमीश दाखवून तिला अज्ञातस्थळी नेऊन बलात्कार केला व रस्त्याच्या कडेला टाकून दिले. एक मुलगी रस्त्यावरून जात असताना चिमुकली दिसली. पोलिसांना माहिती दिल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर आहे. एका चाळीस वर्षाच्या सुरक्षा रक्षकाने तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती पुढे आली आहे. बिंदापूर पोलिस चौकीमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.

दरम्यान, सामूहिक बलात्कारची अन्य एक उघडकीस आली आहे. आधार कार्ड बनवण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला पकडून ठेवून तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. दिल्लीच्या सुल्तानपुरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. अत्याचारानंतर पीडित मुलगी त्याच अवस्थेत रस्त्यावर भटकत असताना एका व्यक्तीने याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ते तिला आपल्यासोबत घेऊन गेले. पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार, पोलिसांनी दोन जणांविरोधात सामुहिक बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. किशन व जमुना अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

Web Title: rape three year old girl and gang rape at new delhi