बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

वृत्तसंस्था
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

अंकित कुमार याने या मुलीला मारहाणही केली, सर्कल अधिकारी राजेशकुमार यांनी सांगितले. या प्रकरणी अंकित कुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे

मुझफ्फरनगर - येथील श्‍यामली जिल्ह्यातील जबलपूर येथे एका अल्पवयीन मुलीला बंदुकीचा धाक दाखवून आणि मारहाण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना येथे उघडकीस आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. पीडित मुलगी घरात एकटीच असताना संशयित अंकीत कुमार याने घरात घुसून पिस्तूलचा धाक दाखवीत बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले.

अंकित कुमार याने या मुलीला मारहाणही केली, सर्कल अधिकारी राजेशकुमार यांनी सांगितले. या प्रकरणी अंकित कुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

दुसऱ्या एका घटनेत श्‍यामली जिल्ह्यातीलच कंडेला गावातील रामदन परिसरात एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राजेश नावाची एक व्यक्ती या महिलेच्या घरात घुसली आणि त्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने त्यास विरोध केल्यानंतर त्याने तेथून पळ काढला, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: rape in uttar pradesh

टॅग्स