बलात्कार पीडितेची 'त्या'मुळे आत्महत्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 जानेवारी 2019

लखनौः बलात्कार प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यामुळे पीडीत महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या पीडित महिलेच्या मागे पती व दोन मुलगे असा परिवार आहे.

बलात्कार प्रकरणातील आरोपींची 15 दिवसांपूर्वी निर्दोष मुक्तता झाली होती. यानंतर पीडीत 35 वर्षीय महिलेने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील कैरनलगंजमध्ये गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शंकर दयाळ आणि त्याचा भाऊ अशोक कुमारने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार महिलने केली होती. महिलेच्या तक्रारीनंतर प्रथम स्थानिक पोलिस व नंतर जिल्हा गुन्हे शाखेने तपास केला होता. दोन्ही तपासामध्ये पोलिसांनी आरोपींना क्लीन चीट दिली होती. दोन्ही आरोपी फरार असून, या प्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

पीडित महिलेच्या पतीने सांगितले की, 'आरोपींनी फक्त बलात्कारच केला नव्हता तर त्यांनी व्हिडिओ क्लिप सुद्धा बनवली होती. पोलिसांनी दोन्ही आरोपींना क्लिन चीट दिल्यामुळे पत्नी नैराष्यात गेली होती. त्यातूनच तिने आत्महत्येचे पाऊल उचलले.'

Web Title: rape victim commits suicide after accused get clean chit at uttar pradesh