16 मुलींवर बलात्कार, 7 वर्षाच्या चिमूरडीची हत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

नवी दिल्ली : बिहार राज्यातील मुझफ्फरपूर मधील मुलींच्या बाल सुधार गृहातील 16 मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, यातील एका 7 वर्षाच्या चिमूरडीने बलात्काराला विरोध केल्यामुळे तिची हत्या करून मृतदेह सुधारगृहाच्या आवारातच गाडून टाकल्याचा अमानूष प्रकारही मुझफ्फरपूर मध्ये घडला. पोलिस तपासामध्ये पिडीतांमधील एका मुलीने पोलिसांना ही माहिती दिली. 

न्यायालयाच्या आदेशानंतर सुधारगृह परिसरात गाडण्यात आलेला सात वर्षाच्या चिमूरडीचा मृतदेह खोदून काढण्याचे काम सुरू आहे. 
वरिष्ठ पोलिस अधीक्षक हरप्रीत कौर यांनी दिलेल्या माहितीनूसार, वसतीगृहाच्या परिसरात खोदकाम सुरू आहे. परंतु, आजून पोलिसांच्या हाती काही लागले नाही. या प्रकरणाची आम्ही सखोल चौकशी करत असून, पोलिस स्वतंत्रपणे काम करीत आहेत.

या प्रकरणात बाल सुधारगृहाचे संचालक ब्रिजेश ठाकूर याच्यासह 8 महिला आणि 3 पुरषांना अटक करण्यात आली आहे.

या घटनेनंतर राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाना साधत या प्रकरणातील आरोपी ब्रिजेश ठाकूर हा आपले बाल सुधारगृह बंद करून नितीश कुमार यांचा निवडणूकीतील प्रचार करण्यासाठी जात होता असे म्हटले आहे. 

ही घटना मागील एक महिन्यापुर्वीच प्रकाशझोतात आली होती. मंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सतर्फे गैर सरकारी संस्थ (एनजीओ) मार्फत चालविल्या जाणाऱ्या बाल सुधारगृहांचे लेखा परिक्षण करणयात आले होते. त्यामधून या अमानूष घटनेला वाचा फुटली.

बाल सुधारगृहातील मारहाणीत मरण पावल्या गेलेल्या मुलीला कोणत्या कर्मचाऱ्यांनी मारले यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
 
Web Title: raped on 16 girls, 7 year old girl murdered