बलात्कार करणाऱ्यांना सर्वांसमोर गोळ्या घाला: भाजप नेता

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 मार्च 2018

'महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांसाठी फाशीची शिक्षा हा एकच निकष असायला हवा. हे प्रकार रोखण्यासाठी बलात्काऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी गोळ्या मारून ठार केले पाहिजे, तरच महिलांवर होणारे हे अत्याचार थांबतील.' असे शर्मा यांनी सांगितले. 

गुवाहाटी (आसाम) : आसाममधील वाढत्या महिला अत्याचाराच्या व बलात्काराच्या पार्श्वभूमीवर आसामच्या तेजपूरचे भारतीय जनता पक्षाचे खासदार आर. पी. शर्मा यांनी बलात्कार करणाऱ्यांना सार्वजनिकरित्या गोळी मारून ठार केले पाहिजे, असे वक्तव्य गुरूवारी केले. 

'महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांसाठी फाशीची शिक्षा हा एकच निकष असायला हवा. हे प्रकार रोखण्यासाठी बलात्काऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी गोळ्या मारून ठार केले पाहिजे, तरच महिलांवर होणारे हे अत्याचार थांबतील.' असे शर्मा यांनी सांगितले. 

आसाममधील नागावच्या बोरूडा या गावी पाच वर्षीय मुलीवर पाच नराधमांनी सामुहिक बलात्कार केला व त्यानंतर तिला तिच्याच घरात जाळण्यात आले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शर्मा बोलत होते. 

Web Title: Rapists must be shoted in public: BJP MP