रतन टाटांचा झाला सन्मान; स्वत: मुख्यमंत्र्यांनी जाऊन दिला पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratan-Tata

रतन टाटांचा झाला सन्मान; स्वत: मुख्यमंत्र्यांनी जाऊन दिला पुरस्कार

मुंबई: आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या घरी जाऊन त्यांना राज्याचा सर्वांत मोठा नागरी पुरस्कार 'आसाम वैभव'ने सन्मानित केलं आहे. रतन टाटांना हा पुरस्कार याआधी 24 जानेवारी रोजी गुवाहाटीमध्ये आयोजित एका कार्यक्रमातच दिला जाणं अपेक्षित होतं. मात्र, काही वैयक्तिक कारणास्तव ते त्या कार्यक्रमात सामील होऊ शकले नाहीत.

हेही वाचा: बजेट अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात होणार विधानसभा अध्यक्षाची निवड

आसाम सरकारने आपल्या या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील 19 लोकांची निवड केली होती. यामध्ये कोरोनाकाळातील फ्रंटलाईन वर्कर्स यांच्यासोबतच उद्योजक देखील सामील होते. रतन टाटांच्या समवेतच आणखी पाच जणांना 'आसाम सौरव' आणि 12 जणांना 'आसाम गौरव'ने सन्मानित करण्यात आलं.

हेही वाचा: "वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?" नार्वेकरांचा राणेंवर निशाणा

पुढील वर्षी लोकांच्या शिफारसीने दिला जाईल पुरस्कार

या पुरस्काराशी निगडीत नियमांनुसार, हा सर्वोच्च सन्मान आसाम वैभव प्रत्येक वर्षी केवळ एकाच व्यक्तीला दिला जाणार आहे. तर आसाम सौरव तीन लोकांना दिला जाईल तर आसाम गौरव 15 लोकांना दिला जाणार आहे. या प्रकारे एकूण 19 लोकांना हे पुरस्कार दिले जातील. मात्र, प्रत्येक वर्षी काही कारणास्तव यामध्ये थोडा बदल झालेला दिसून येतो. पुढील वर्षी लोकांच्या शिफारसीनुसार हे पुरस्कार प्रदान केले जाणार असून लवकरच सरकार त्यासाठी एका पोर्टलची सुरुवात करणार आहे.

Web Title: Ratan Tata Himanta Biswa Sarma Presents Asom Baibhav The Highest State Civilian Award

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..