आता रेशन दुकानावर स्वस्त दरात मिळणार मटण, चिकन, अंडी अन् मासे !

वृत्तसेवा
बुधवार, 18 डिसेंबर 2019

रेशन दुकानावर लवकरच अन्नधान्यांबरोबरच स्वस्त दरात चिकन, मटण, मासे आणि अंडी देखील रेशन दुकांनावर मिळण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रेशन दुकानातून गरिबांना स्वस्त दरात चिकन, मटण आणि अंडी देखील उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा विचार आहे. सध्या रेशन दुकानांवर गरिबांना गहू, तांदूळ, कडधान्ये, साखर, तेल या वस्तू कमी किंमतीत किंवा सवलतीच्या दरात मिळतात, या पार्श्वभूमीवर हा सरकारकडून विचार चालू असल्याचे सांगण्यात येत आहे. 

पुणे : रेशन दुकानावर लवकरच अन्नधान्यांबरोबरच स्वस्त दरात चिकन, मटण, मासे आणि अंडी देखील रेशन दुकांनावर मिळण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रेशन दुकानातून गरिबांना स्वस्त दरात चिकन, मटण आणि अंडी देखील उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा विचार आहे. सध्या रेशन दुकानांवर गरिबांना गहू, तांदूळ, कडधान्ये, साखर, तेल या वस्तू कमी किंमतीत किंवा सवलतीच्या दरात मिळतात, या पार्श्वभूमीवर हा सरकारकडून विचार चालू असल्याचे सांगण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

Image result for mutton"

नीती आयोगाचे रेशन दुकानांवरील वस्तूंची यादी व्यापक करण्याचे प्रयत्न सुरू असून सुरुवातीला किमान एक ते दोन प्रोटीनयुक्त पदार्थ रेशन दुकानावर उपलब्ध केले जातील. प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थांमध्ये मटण, अंडी, मच्छी आणि चिकन या खाद्यवस्तू ग्राहकांना खरेदी करता येतील.

Image result for fish in market"

अन्नसुरक्षा योजनेचा विस्तार करून पोषण सुरक्षेला सरकार प्राधान्य देणार आहे. गरिबांना पोषण आहार सहज आणि कमी किंमतीत उपलब्ध व्हावा, हा यामागील उद्देश आहे. सुरुवातीला किमान एक ते दोन प्रोटीनयुक्त पदार्थ रेशन दुकानावर उपलब्ध केले जातील असं सांगितलं जात आहे.

Image result for egg"

अशाने राज्याची मान खाली जाते; फडणवीसांकडून खोटा व्हिडिओ ट्विट

देशातील कुपोषण आणि अ‍ॅनिमियासारख्या समस्या दूर करण्यासाठी पुढील 15 वर्षांसाठी नीती आयोगाकडून एक व्हिजन डाक्युमेंट बनवलं जाणार आहे, ज्यात पौष्टीक खाद्यपदार्थ आणि पोषण सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल. हे व्हिजन डाक्युमेंट 1 एप्रिल 2020 पासून लागू केले जाईल. यामुळे अन्नसुरक्षा विधेयक आणखी मजबूत होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ration Shops People Will Soon Get Chicken Eggs Mutton