रतुल पुरींच्या मालमत्तेवर टाच

पीटीआय
Monday, 12 August 2019

ऑगस्टा वेस्टलॅंड गैरव्यवहारप्रकरणी उद्योगपती रतुल पुरी आणि दीपक पुरी यांच्या मालमत्तेवर आज प्राप्तिकर विभागाने टाच आणली. बेनामी मालमत्ता विरोधी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. या मालमत्तेत दिल्लीत उच्चभ्रू भागातील 300 कोटींचा बंगल्याचा समावेश आहे. रतुल पुरी हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे भाचे आहेत.

नवी दिल्ली - ऑगस्टा वेस्टलॅंड गैरव्यवहारप्रकरणी उद्योगपती रतुल पुरी आणि दीपक पुरी यांच्या मालमत्तेवर आज प्राप्तिकर विभागाने टाच आणली. बेनामी मालमत्ता विरोधी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. या मालमत्तेत दिल्लीत उच्चभ्रू भागातील 300 कोटींचा बंगल्याचा समावेश आहे. रतुल पुरी हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे भाचे आहेत. रतुल पुरी आणि दीपक पुरी यांची मॉरिशस येथील कंपनीच्या नावावर असलेल्या 4 कोटी डॉलरची मालमत्तादेखील ताब्यात घेतली आहे.

निनावी मालमत्ता विरोधी संस्थेने (बीपीयू) 9 लाख डॉलरचे फंड आणि औरंगजेब रोडवरील बंगलाही ताब्यात घेतला आहे. तत्पूर्वी दिल्लीच्या एका न्यायालयाने शुक्रवारी रतुल पुरी यांच्याविरुद्ध अजामीन वॉरंट बजावले होते. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अरविंद कुमार यांनी ईडीला पुरीविरुद्ध वॉरंट बजावण्यास परवानगी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratul Puri Property Income Tax Department Crime