मुख्यमंत्र्याच्या भाच्यानं रात्रीत उडवले 8 कोटी; ईडीकडून गुन्हा दाखल

वृत्तसेवा
Sunday, 20 October 2019

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाच्यानं एका रात्रीत जवळपास 8 कोटी रुपयांची उधळण केली आहे. ईडीकडून ही बाब समोर आली आहे. ईडीने मुख्यमंत्र्यांच्या भाच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं असून त्याची चौकशी सुरू केली आहे.

नवी दिल्ली : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाच्यानं एका रात्रीत जवळपास 8 कोटी रुपयांची उधळण केली आहे. ईडीकडून ही बाब समोर आली आहे. ईडीने मुख्यमंत्र्यांच्या भाच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं असून त्याची चौकशी सुरू केली आहे.

मोजर बेयर इंडिया लिमिटेड कंपनीविरोधात 8 हजार कोटी लोन तर मनी लॉन्ड्रिंगसंबंधीत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या आरोपपत्रात चौकशीदरम्यान ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कलमनाथ यांचा भाचा रतुल पुरी यांनी परदेशात लाखो रुपये उधळल्याची बाब चौकशीदरम्यान समोर आली आहे. आरोपपत्रानुसार अमेरिकेत एका रात्री त्यांनी नाईटक्लबमध्ये 11 लाख डॉलर म्हणजे 7.8 कोटी रुपये उडवल्याचं नमूद करण्यात आलं आहे. रतुल पुरी हे व्हीहीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपी असलेल्या व्यापाऱ्याचं क्रेडिट कार्ड वापरत होते. क्रेडिट कार्डच्या मदतीनं त्यांनी विमानातून प्रवास केला आणि नाईटक्लबचे पैसेही भरले. क्रेडिट कार्डद्वारे रतुल पुरी यांची लाखो रुपये उधळून मौजमजा चालू होती. ऐशोआरामाचं जीवन जगणाऱ्या रतुल पुरींविरोधा या प्रकरणानंतर मात्र ईडीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने या आधी रतुल पुरी त्यांचे वडील दीपक पुरी आणि आई नीतासह इतर काही लोकांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. 354 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा पुरी कुटुंबियांवर आरोप आहे. दरम्यान, ईडीने न्यायालयात एकूण 110 पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. रतुल पुरी यांच्यावर व्हीव्हीआयपी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याचा आरोप आहे. आरोपपत्रात दिलेल्या माहितीनुसार पुरी यांचा खर्च 2016 पर्यंत 4.5 होता. मात्र, यावेळी तो 8 हजार करोड रुपयांपर्यंत झाला आहे. हा खर्च जादा असल्यानं त्याची ईडीकडून चौकशी करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratul Puri spent 8 cr in a single night at US night club