हवाई प्रवासबंदी प्रकरणात गायकवाडांच्या बाजूने सप

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मार्च 2017

विमान कंपन्यांच्या वर्तनावर आगरवाल यांची झोड

नवी दिल्ली- एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणारे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना पाच किमान कंपन्यांनी केलेल्या हवाईबंदी प्रकरणी समाजवादी पक्ष संसदेत खुलेपणाने गायकवाड यांच्या बाजूने उतरला.

राज्यसभेत सपचे नरेश आगरवाल यांनी विमान कंपन्यांच्या या वर्तनावर झोड उठवताना त्याचे वर्णन "दादागिरी' असे केले. भाजपने मात्र या प्रकरणात तटस्थ भूमिका घेतली आहे.

शून्य प्रहरात कॉंग्रेसचे दिग्विजयसिंह यांनी गोव्याच्या राज्यपालांच्या भूमिकेवर केलेली चर्चेची मागणी सरकारने मान्य केली नसल्याने ते भडकले होते. "यूपीए' काळात भाजपच्या मागणीवरून बिहारच्या राज्यपालांवर याच सभागृहात चर्चा होऊ दिली; मात्र भाजपने मंजूर विषयही कामकाजपत्रिकेतून वगळला, असा आरोप दिग्विजयसिंह यांनी करताच उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांनी त्यांना गप्प बसविले.
आगरवाल यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे गायकवाड यांच्यावरील विमान कंपन्यांच्या बंदीचा मुद्दा उचलून धरला. गायकवाड यांनी विमान कर्मचाऱ्याला मारहाण केली हे अयोग्य असले तरी अशी कोणती परिस्थिती उद्‌भवली की गायकवाड यांचा संताप अनावर झाला, असा प्रश्‍न शिवसेनेने उपस्थित केला. गायकवाड हे या प्रकरणी दोषी सिद्ध होत नाहीत तोवर त्यांना बोर्डिंग पासच नाकारणे ही विमान कंपन्यांची दादागिरी असल्याचे आगरवाल यांनी सांगितले.

सनदी सेवांमध्ये इतर मागासवर्गीयांच्या जागा मुद्दाम भरल्या जात नाहीत, असा आक्षेप सपचे नेते रामगोपाल यादव यांनी नोंदवताच गोंधळ झाला. शरद यादव यांनीही हाच मुद्दा मांडताना आरक्षणाची तरतूद होऊन 27 वर्षे उलटली, तरी ओबीसींना सरकारी नोकऱ्यांत न्याय मिळत नसल्याची तक्रार केली. बसपच्या मायवती यांनी मागासवर्गीय अधिकाऱ्यांवरही भाजप सरकारच्या कार्यकाळात पक्षपात व भेदभाव वाढल्याचा आरोप केला. या मुद्द्यावरून झालेल्या गोंधळात शून्य प्रहर व प्रश्‍नोत्तराचा तास "स्वाहा' झाला.

Web Title: ravindra gaikwad and air india news