रवींद्र गायकवाडांना नाव बदलूनही मिळेना तिकीट

पीटीआय
शुक्रवार, 31 मार्च 2017

बुकींगचे प्रयत्न निष्फळ ; एजंटचीही घेतली मदत

नवी दिल्ली: "एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने विमानप्रवास बंदीला सामोरे जाणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. गायकवाड यांनी आपल्या नावामध्ये फेरफार करत तीनदा विमान तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचे हे प्रयत्नही निष्फळ ठरले.

सुरवातीस गायकवाड यांच्या कर्मचाऱ्याने रवींद्र गायकवाड या नावानेच तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला; पण काही क्षणांमध्येच हे तिकीट कंपनीकडून रद्द करण्यात आले. त्यानंतर प्रोफेसर व्ही. रवींद्र गायकवाड या नावाने हैदराबाद ते दिल्लीदरम्यानच्या प्रवासाठी तिकीट बुक करण्यात आले असता तेही रद्द करण्यात आले. दुसऱ्या दिवशी नागपूर ते दिल्लीदरम्यानच्या प्रवासासाठी प्रोफेसर रवींद्र गायकवाड या नावाने तिकीट बुक करण्याचा प्रयत्न झाला. यासाठी गायकवाड यांच्या कर्मचाऱ्याने ट्रॅव्हल एजंटची मदत घेतली होती. ट्रॅव्हल एजंटने तातडीने ही माहिती स्थानक व्यवस्थापकास दिल्यानंतर ती काही क्षणांमध्ये एअर इंडियाच्या मुख्यालयापर्यंत पोचल्याची माहिती सूत्रांनी दिली. गायकवाड यांना हवाई प्रवास करणे शक्‍य होऊ नये म्हणून विमान कंपनीने स्थानक व्यवस्थापक आणि नोंदणी कार्यालयांना अस्वीकृती आदेश जारी केला आहे. एखाद्या खासदारावर विमान कंपन्यांनी अशा पद्धतीने बहिष्कार घालण्याची ही पहिलीच वेळ आहे.

...तर वाद मिटला असता
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतरही गायकवाड यांनी माफी मागण्यासही नकार दिल्याने विमान कंपन्यांचे व्यवस्थापन चिडले आहे. एअर इंडियासह पाच विमान वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी गायकवाड यांच्यावर बहिष्कार घालत त्यांच्या विमानप्रवासावर बंदी घातली आहे. या मारहाणीच्या प्रकारानंतर गायकवाड यांनी माफी मागितली असती, तर हे प्रकरण मिटले असते असे काहींचे म्हणणे आहे.

Web Title: ravindra gaikwad and airplane ticket