रवींद्र जडेजाची पत्नी होणार 'या' सेनेची अध्यक्ष

Jadeja And his Wife
Jadeja And his Wife

नवी दिल्ली- भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा आता पूर्णपणे राजकारणात उतरण्याच्या तयारीत आहे. राजपूतांची संघटना असलेल्या करणी सेनेने रिवाबा हिला गुजरातच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदी चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या चित्रपटाच्या नावावरुन करणी सेनेने मोठा वाद निर्माण केला होता. तसेच, चित्रपटाला विरोधही दर्शवण्यात आला होता.

करनी सेनेचे अध्यक्ष महिेपाल सिंह मकराणा यांनी राजकोटमध्ये एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान ही घोषणा केली आहे. या कार्यक्रमाच्यावेळी जडेजाची पत्नी रिवाबाही उपस्थित होती. यावेळी रिवाबानेही स्पष्ट केले आहे की, ती महिलांना आणि मुलींना सशक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे. 

दरम्यान, 29 वर्षाचा असलेला भारतीय फिरकीपटू रविंद्र जडेजाने 2016 मध्ये रिवाबासोबत लग्न केले होते. त्या दोघांना एक मुलगीदेखील आहे. तसेच, यावर्षीच जामनगरमध्ये एका अपघातात पोलिसांकडून रिवाबावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थात करणी सेनेने अंदोलन केले होते. रिवाबा ही मूळ जूनागढची रहिवाशी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com