बॅंकाना सीसीटीव्ही जपून ठेवण्याचे आरबीआयचे आदेश

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटेवर घातलेल्या बंदीनंतर बॅंकानी त्या दिवसांपासून ते 30 डिसेंबर पर्यंतचे सीसीटीव्हीमधील चित्रीकरण जपून ठेवावे, असे आदेश रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) बॅंकांना दिले आहेत.

आरबीआयने बॅंकाना आज नोटीस जारी केली आहे. नोटीसीमध्ये म्हटले आहे की, 'बॅंकांनी 8 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत व पुढील सुचना देईपर्यंत सीसीटीव्हीमधील चित्रीकरण जपून ठेवावे.'

दरम्यान, आरबीआयने सोमवारी (ता. 12) सर्व बँकाना नवीन नोटांचे रेकॉर्डसही ठेवण्याचे आदेश दिले आहेत. देशभरातील विविध बॅंकांमध्ये आयकर व सक्तवसुली संचलनालयाकडून धडक कारवाई सुरू आहे. कारवाईदरम्यान विविध बॅंकांच्या व्यवस्थापकांना ताब्यात घेण्यात आले आहे. बँकेमधील संपुर्ण माहिती ठेवण्याबरोबरच नवीन नोटांचा सीरिअल क्रमांक तसेच आरबीआयकडून मिळालेल्या चलनाची नोंद ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय, प्रत्येक दिवशी कामकाज संपल्यानंतर व्यवस्थापकाला स्वाक्षरी करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: RBI advises banks to preserve CCTV recordings of operations from November 8 to December 30, 2016