एटीएममधून दिवसाला मिळणार दहा हजार रुपये

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

नवी दिल्ली: नोटाबंदीमुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी बँकांनी एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढविली आहे. लोकांना दररोज दहा हजार रुपयांची रोख रक्कम उपलब्ध होऊ शकणार आहे. याआधी ही मर्यादा साडेचार हजार रुपयेएवढी होती. याशिवाय, चालू खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा 50,000 रुपयांवरुन 1,00,000 रुपये करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर रोजी आर्थिक देशांतर्गत व्यवहारांमधून पाचशे व हजारांच्या नोटा बाद केल्याची घोषणा केली होती. याऐवजी पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा छापण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र नव्या नोटा चलनात येईपर्यंत उपलब्ध नोटांपैकी 86 टक्के चलनी नोटा बाद झाल्याने अचानक रोखीचा तुटवडा निर्माण झाला. यामुळेच बँकांमधून व एटीएममधून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आली होती.

मात्र, आता आर्थिक व्यवहार पुर्वपदावर येत असल्याने बँकांकडे पुरेशी रोख उपलब्ध झाल्याने एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढविण्यात आली आहे.

Web Title: RBI enhances cash withdrawal limit from ATMs to Rs 10,000 per day per card