पीएमसीच्या ग्राहकांना दिलासा; आता काढता येणार एवढे पैसे 

RBI increases withdrawal limit for PMC Bank customers to Rs 40000
RBI increases withdrawal limit for PMC Bank customers to Rs 40000

मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या ग्राहकांना रिझर्व्ह बॅंकेने सोमवारी मोठा दिलासा दिला. रिझर्व्ह बॅंकेने "पीएमसी'मधून पैसे काढण्याच्या मर्यादेत तिसऱ्यांदा वाढ केली आहे. या निर्णयामुळे "पीएमसी'च्या ग्राहकांना आता 25 हजारांऐवजी 40 हजार रुपये काढता येतील, असे रिझर्व्ह बॅंकेने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. 

पीएमसी बँकेच्या बाहेर गर्दीच गर्दी; अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ!

बॅंकेचा आर्थिक आढावा घेतल्यानंतर खातेदार आणि ठेवीदारांचा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले. पीएमसी बॅंकेवरील निर्बंधांमुळे लाखो खातेदार आणि ठेवीदार हवालदिल झाले आहेत. पैसे काढण्यावर मर्यादा आल्याने ठेवीदारांकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. नुकताच बॅंकेच्या खातेदारांनी मुंबईत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना घेराव घातला होता. त्यानंतर सीतारामन यांनी रिझर्व्ह बॅंकेने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातल्याची ग्वाही दिली होती. 

पीएमसी बॅंक गैरव्यवहार : रजिस्ट्रारच्या डोळ्यातही धूळफेक

दरम्यान, ठेवीदारांचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पीएमसी बॅंकेचे कर्जबुडवे "एचडीआयएल'चे प्रवर्तक राकेश वाधवा आणि सारंग वाधवा यांच्या तीन हजार कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com