आरबीआयने सायबर घोटाळ्यांबाबत केले सावध! या चुका टाळा अन्यथा गमवाल पैसे

rbi.jpg
rbi.jpg

नवी दिल्ली- काही दिवसांपूर्वीच ट्विटरवर सायबर हल्ला झाला होता. यात अनेक दिग्गज लोकांचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही लोकांना सायबर गुन्हेगारी आणि ओळख चोरीपासून (आयडेन्टी थेफ्ट) वाचण्याचा इशारा दिला आहे. आरबीआयने यासंदर्भात ट्विट केलं आहे. सायबर घोटाळ्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्यांचे पैसे सुरक्षित राहण्यासाठी अधिक सतर्क राहायला हवं, असं आरबीआयने म्हटलंय. एक जीआयएफही बँकेकडून शेअर करण्यात आला आहे, ज्यात काही सूचना देण्यात आल्या आहेत.

सायबर घोटाळ्याच्या घटना वाढत आहेत, त्यामुळे ग्राहकांनी आपला वन टाईम पासवर्ड (OTP), यूपीआय पीन आणि इतर बँक डिटेल्स कोणासोबत शेअर करु नये. केंद्रीय बँकेने शेअर केलेल्या जीआयएफमध्ये एखादा व्यक्ती तुमची वैयक्तिक माहिती मिळवून कशाप्रकारे व्हर्चुअल पेमेंट अकाऊंट (व्हीपीए) तयार करु शकतो आणि खात्यामधून पैसे काढू शकतो हे दाखवण्यात आलं आहे.

ओळख चोरी-

ऑनलाईन वापरकर्त्यांसाठी ओळख चोरी मोठी धोकादायक बाब ठरत आहे. नॉर्थोनलाईफलॉकच्या एप्रिलमधील माहितीनुसार, भारतातील १० पैकी ४ ग्राहकांना केव्हातरी ओळख चोरीचा सामना करावा लागला आहे. विशेष करुन मागील वर्षामध्ये यात मोठी वाढ झाली आहे. 

ओळख चोरीपासून वाचण्यासाठी तुम्ही खूप खबरदारी घेतली पाहिजे. जसे की, खरेदीसाठी खात्रीलायक वेबसाईटचा वापर करणे, सुरक्षित नेटवर्कचा वापर करणे,  कार्ड रिडर किंवा एटीएम वापरताना त्याला कोणते डिव्हाइस जोडले आहे का ते पाहणे, क्रेडिट कार्डच्या स्टेटमेंटवर वेळोवेळी लक्ष देणे.

सायबर घोटाळ्यापासून कसे रहाल दूर-

१. जर तुम्ही नवीन मोबाईल, आयफोन किंवा लॅपटोप खरेदी केला असेल तर तुमची वैयक्तिक माहिती त्यात खाजगी ठेवा. तसेच तुमच्या जुन्या डिव्हाइसमधून सर्व माहिती डिलिट करु टाका. डिव्हाइस क्लिन करण्यासाठी उत्पादकाच्या सूचनांचे पालन करा.

२. कोणाचेही चार्जर केबल किंवा  सार्वजनिक यूएसबी चार्जिंग स्टेशनचा वापर करु नका. सायबर गुन्हेगार या माध्यमातून तुमच्या डिव्हाइसमध्ये मालवेर घुसवू शकतात.

३. सार्वजनिक wi-fi नेटवर्क वापरणे सोयीचे असू शकते, पण हँकर्स या माध्यमातून तुमच्या ऑनलाईन अॅक्टिविटी पाहू शकतात. ही माहिती  तुमचे वैयक्तिक खाते किंवा संवेदनशील माहिती चोरण्यासाठी वापरली जाऊ शकते. त्यामुळे नेहमी खाजगी नेटवर्क वापरण्याचा प्रयत्न करा.

४. मायक्रोसॉफ्ट किंवा गूगल सारख्या कंपन्या तुम्हाला कधीच फोन करणार नाहीत. तसेच क्रेडिट कार्ड किंवा बँक अधिकारी तुम्हाला ओटीपी किंवा क्रेडिट कार्ड डिटेल्स अशी संवेदनशील माहिती मागणार नाहीत. त्यामुळे अशी माहिती कोणालाही देऊ नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com