भाजपकडून लोकशाहीची हत्या : सुरजेवाला

वृत्तसंस्था
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

- लोकशाहीची ही एकप्रकारे हत्याच

- आता महाराष्ट्रात अशाप्रकारचे राजकारण केलं जात आहे.

नवी दिल्ली : संविधानाची पानं फाडून सार्वजनिक मर्यादा सोडून एखाद्याचा चोरून शपथविधी झाला. कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, गोवा आणि आता बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात अशाप्रकारचे राजकारण केले जात आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राजकीय प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर दिल्या जात आहेत. त्यातच आता काँग्रेसने ही आपली प्रतिक्रिया दिली. सुरजेवाला म्हणाले, सरकार बनविण्याच्या दाव्यावर किती आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र देण्यात आले? त्या स्वाक्षरींची सत्यता कशाप्रकारे पटवली? 

तसेच सत्तेच्या हव्यासापोटी भाजपने हे अशाप्रकारचे राजकारण केले. आमदारांच्या निष्ठेला भाजपने तिलांजली दिली. भाजपने सत्तास्थापनेचा दावा कधी केला? असा सवालही त्यांनी यावेळी केला. लोकशाहीची ही एकप्रकारे हत्याच आहे, असेही सुरजेवाला यांनी सागितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reaction of Randeep Surjewala about Maharashtra Government Formation