Delhi Elections : दिल्लीतील पराभवावर भाजपची प्रतिक्रिया; नड्डा म्हणाले...

वृत्तसंस्था
Tuesday, 11 February 2020

- विरोधी पक्षाची भूमिका जबाबदारीपूर्वक बजावू

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा विजय झाला तर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यावर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रतिक्रिया दिली. ''दिल्लीतील जनतेने दिलेल्या जनादेशाचा आम्ही स्वीकार करत आहोत. दिल्लीत भाजप विरोधी पक्षाची भूमिका जबाबदारीपूर्वक पार पाडेल'', असे ते म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी सुरु झाली. यामध्ये आपला सर्वाधिक जागा मिळाल्या. आप 63 जागांवर असून, भाजपला फक्त 7 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना नड्डा म्हणाले, आम्ही पराभव मान्य करतो. तसेच मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा आम्ही स्वीकार करतो. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयासाठी अरविंद केजरीवाल आणि आपच्या कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.

Image result for delhi assembly

विरोधी पक्षाची भूमिका जबाबदारीपूर्वक बजावू

आम्ही दिल्लीत विरोधी पक्षाची भूमिका जबाबदारीपूर्वक बजावू. दिल्लीच्या विकासाबाबतचे मुद्दे आम्ही उपस्थित करू. दिल्लीतील जनतेचा विकास आप करेल, अशाप्रकारची अपेक्षा यावेळी करतो.

Delhi Election : 'आय लव्ह यू' म्हणत विजयानंतर केजरीवालांनी दिली 'ही' प्रतिक्रीया


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reactions of JP Nadda after BJP Defeated in Delhi Assembly Elections