esakal | स्थलांतरितांसाठी धावल्या एवढ्या रेल्वे; किती लोकांनी केला प्रवास वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

प्रयागराज - सुरतहून विशेष रेल्वेने बुधवारी प्रयागराज येथे दाखल झालेल्या स्थलांतरित मजुरांना तपासणीसाठी स्थानकावर थांबवण्यात आले.

तिकीट आकारणीबद्दल झाली टीका
श्रमीक एक्सप्रेससाठी तिकीट आकारणी केल्याबद्दल रेल्वेवर मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. संकटाच्या काळात कामगारांना मदत करण्याएवजी त्यांच्याकडून अतिरिक्त तिकीट वसूल करणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त करत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला होता.

अशी आहे श्रमिक एक्सप्रेस

  • प्रत्येक विशेष रेल्वेगाडीला २४ डबे
  • प्रत्येक डब्याची प्रवासी क्षमता ७२
  • सध्या प्रत्येक डब्यातून फक्त ५४ जणांनाच प्रवासाची मुभा
  • सेशल डिस्टंसिंगच्या नियमाचे काटेकोर पालन
  • मधला बर्थ ठेवला जात आहे रिकामा
  • गाडीच्या प्रवासी क्षमतेच्या ९० टक्के बुकिंग आवश्यक
  • तिकिटाचे पैसे राज्यांनीच जमा करावेत 

स्थलांतरितांसाठी धावल्या एवढ्या रेल्वे; किती लोकांनी केला प्रवास वाचा

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - स्थलांतरित कामगारांच्या मदतीला रेल्वे विभाग धावून आला असून, कोरोनाच्या संकटामुळे सैरभैर झालेल्या या कामगारांना त्यांच्या गावी परतण्यासाठी रेल्वेकडून श्रमिक एक्सप्रेस चालविण्यात येत आहेत. एक मे पासून ८३ श्रमिक एक्सप्रेस रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या असून, त्याद्वारे ८० हजारांहून अधिक कामगारांनी गाव जवळ केले असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर ठिकठिकाणी मोठ्या संख्येने स्थलांतरित कामगार, मजूर अडकून पडले आहेत. हाताला काम नाही, त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागणाऱ्या या कामगार, मजुरांना उपाशीपोटी दिवस काढावे लागत आहे. अशा कठीण काळात आपल्या मूळ गावी जाण्याची ओढ त्यांना लागली नसेल तरच नवल. अतिशय कठीण प्रसंगात रेल्वेने या कामगारांना मदतीचा हात दिला आहे. त्यांना आपल्या मूळ राज्यात जाता यावे म्हणून रेल्वेने एक ते पाच मे या कालावधीत एकूण ८३ श्रमिक एक्सप्रेस गाड्या सोडल्या. 

श्रमिक एक्सप्रेस रेल्वे गाड्यांसाठी रेल्वेला नेमका किती खर्च आला आहे, याची माहिती रेल्वेकडून अधिकृतरित्या देण्यात आलेली नाही. रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यातील खर्चाचे गुणोत्तर ८५ : १५ असे निश्चित केल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. रेल्वेने या गाडीच्या प्रत्येक फेरीवर ८० लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती देण्यात आली.

कर्नाटक 
पुढील पाच दिवसांमधील दहा रेल्वे गाड्या कर्नाटक सरकारकडून रद्द
बिहारकडे जाणाऱ्या तीन रेल्वे गाड्या मात्र बंगळुरातून सुटणार

गुजरात, केरळ  
मंगळवारी गुजरातेतून ३५, तर केरळातून १३ रेल्वे गाड्या निघाल्या

बिहार 
मंगळवारपर्यंत १३ रेल्वे गाड्या दाखल
बिहारसाठी ११ गाड्या मार्गस्थ झाल्या
आणखी सहा गाड्या सोडल्या जाणार आहेत

उत्तर प्रदेश
दहा रेल्वे गाड्या दाखल 
पाच गाड्या प्रवासात आहेत
आणखी १२ गाड्यांचे नियोजन आहे

पश्चिम बंगाल 
आत्तापर्यंत दोन गाड्यांनाच परवानगी
राजस्थान व केरळातून प्रत्येकी एक गाडी मार्गस्थ

झारखंड 
चार रेल्वे गाड्या दाखल
पाच गाड्या झारखंडकडे रवाना
आणखी दोन गाड्या सोडल्या जाणार

ओडिशा  
सात रेल्वे गाड्या दाखल
पाच रेल्वे गाड्या ओडिशाच्या दिशेने रवाना
आणखी एक गाडी सोडण्याचे नियोजन

आकडेवारी
८३ पाच दिवसांत धावलेल्या रेल्वे गाड्या
८० हजार प्रवास केलेल्या कामगारांची संख्या
८० लाख प्रत्येक फेरीसाठी रेल्वेला येणार खर्च