कुराण वाचा अन् 'निपाह'पासून राहा दूर 

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 मे 2018

निपाह विषाणूमुळे केरळसह देशभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यापासून वाचण्यासाठी लस किंवा अन्य कोणतेही वैद्यकीय उपचार उपलब्ध नाहीत.

नवी दिल्ली : 'निपाह' विषाणूमुळे आत्तापर्यंत 10 पेक्षा अनेक जणांचा मृत्यू झाला असून, या विषाणूचा धोका सध्या केरळमध्ये जास्त प्रमाणात आहे. त्याला रोखण्यासाठी सध्या कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. असे असताना निपाहपासून दूर राहायचे असल्यास कुराण वाचा, असा सल्लाच सुन्नी नेते नजर फैजी कुदाथयी यांनी मुस्लिम समाजातील लोकांना दिला. 

nipah

निपाह विषाणूमुळे केरळसह देशभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यापासून वाचण्यासाठी लस किंवा अन्य कोणतेही वैद्यकीय उपचार उपलब्ध नाहीत. कुदाथयी यांनी सांगितले, की ''निपाह व्हायरसपासून बचाव करायचा असेल तर निपाह प्रभावित क्षेत्रातील लोकांनी कुराणमधील 36 व्या अध्यायातील 'सुराह-अल-यासीन' वाचायला हवे. याशिवाय शेख अब्दुल कादिर जिलानी यांच्या नावाचा एक हजार वेळा जप करायला हवा, असे केल्यास निपाह विषाणूचा धोका आपल्याला पोचणार नाही, असा दावा कुदाथयी यांनी केला. 

दरम्यान, कुराणमध्ये एक प्रकारची प्रार्थना असून, ती प्रार्थना कोणत्याही आजारांपासून बचाव करण्यासाठी मल्ल्याळी लोक याचे वाचन करतात. सुमारे 500 वर्षापूर्वी शेख जैनुद्दिन मखदूम यांनी पहिल्यांदा याचा वापर केला होता. 

Web Title: Read Quran and stay away from Nipah

टॅग्स