दलित व्यक्तीसाठी मुख्यमंत्रीपद सोडेण; सिद्धरामय्या

वृत्तसंस्था
रविवार, 13 मे 2018

दलित व्यक्ती मुख्यमंत्री होत असल्यास मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडून देईल असे ट्विट मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले आहे. कर्नाटक राज्यात झालेल्या विधानसभा मतदानानंतर सर्वांचे लक्ष निकालाकडे लागलेले असताना सिद्धरामय्या यांनी हे मोठे विधान केले. विविध संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये कर्नाटकात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल अशी शक्यता वर्तवली आहे.

या मतदानोत्तर चाचण्या पुढील दोन दिवसांसाठी मनोरंजनाचे साधन आहेत. एक्झिट पोल पोहता न येणाऱ्या व्यक्तीसारखे आहेत. यामध्ये व्यक्ती बुडणार नाही. कारण त्याला नदी चार फुट खोल असल्याचे सांगून भ्रमित केले असल्याचेही ट्विटमध्ये म्हटले आहे.
काही अंदाजांमध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळण्याची शक्‍यता दिसत असल्यामुळे हा पक्ष पुन्हा सत्तेवर येण्याची चिन्हेही आहेत. बहुमत कोणालाच मिळाले नाही, तर धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) "किंगमेकर'च्या भूमिकेत येऊ शकतो, असे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. लोकसभेसाठी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यादृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यातही पक्षाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर राहुल यांची ही पहिलीच कसोटी आहे.

Web Title: ready to sacrifice cm post for dalit says siddaramaih