'मोदींच्या गुजरात मॉडेल खरा चेहरा समोर येत आहे'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात मॉडेलचा खरा चेहरा समोर येत असल्याची टीका कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी केली आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात मॉडेलचा खरा चेहरा समोर येत असल्याची टीका कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी केली आहे.

दिग्विजयसिंह यांनी ट्विटरद्वारे टीका केली आहे. "सुरुवातीला शेतकरी नंतर कामगार नंतर व्यापारी नंतर सेवानिवृत्त व्यक्ती आणि आता माध्यमे' असे म्हणत त्यांनी मोदींच्या गुजरात मॉडेलचा खरा चेहरा समोर येत असल्याचे म्हटले आहे. "एनडीटीव्ही' वर एक दिवसाची बंदी आणण्याच्या प्रस्तावाच्या पार्श्‍वभूमीवर दिग्विजयसिंह यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच मध्य प्रदेश सरकारने भोपाळ चकमकीच्या न्यायालयीन चौकशीची मागणी मान्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. मात्र त्यावरूनही टीका करताना न्यायालयीन चौकशीचे नियम आणि अटीही स्पष्ट कराव्यात आणि या प्रकरणाची चौकशी न्यायालयाच्या देखरेखेखाली करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

भोपाळ तुरुंग हे अतिसुरक्षित तुरुंग आहे. तेथे कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. तसेच यावरून मध्यप्रदेशच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना लक्ष्य करत "हे आहे मध्य प्रदेश व प्रशासनाच्या सुप्रशासनाचे उदाहरण', असे म्हटले आहे.

Web Title: The real face of Modis Gujrat Model coming