गुजरातमधील गरिबी हिंसेचे कारण : राहुल गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

गुजरातमधील गरिबी हेच तिथल्या हिंसेचे कारण असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटद्वारे सांगितले आहे. गरिबीची दहशत खूप वाईट असते. गुजरातमधील हिंसेचे खरे कारण तेथे वाढलेली बेरोजगारी आहे. तसेच, तिथल्या औद्यौगिकरणाला लगाम बसला आहे या कारणामुळे बेरोजगारी वाढतच आहे आणि यातूनच सामुहिक हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली- गुजरातमधील गरिबी हेच तिथल्या हिंसेचे कारण असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटद्वारे सांगितले आहे. गरिबीची दहशत खूप वाईट असते. गुजरातमधील हिंसेचे खरे कारण तेथे वाढलेली बेरोजगारी आहे. तसेच, तिथल्या औद्यौगिकरणाला लगाम बसला आहे या कारणामुळे बेरोजगारी वाढतच आहे आणि यातूनच सामुहिक हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

त्याचबरोबर, गुजरातमधील व्यवस्था आणि अर्थव्यवस्था दोन्हींची अवस्था बिघडली आहे. बाहेर राज्यातून येणाऱया कामगारांवर हल्ले करणे ही चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. या गोष्टीच्या आपण पूर्णपणे विरोधात उभे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 

दरम्यान, गुजरात मधील साबरकांठा येथे 28 सप्टेंबर या दिवशी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात एक बिहारी मजूराला पोलिसांनी अटक केले होते. या अटकेमुळे स्थानिक संघटनांनी बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील नागरिकांवर निशाणा साधून त्यांना मारहाण, धमक्या देण्यात सुरूवात केली. या भितीमुळे हजारो नागरिकांनी गुजरातमधून पळ काढला.

Web Title: Reasons for Poverty In Gujarat Says Rahul Gandhi on Twitter