बदललेला भारत ओळखा - पंतप्रधान मोदी

नंदकुमार सुतार : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

नवी पिढी नव्या बाबी आत्मसात करीत आहे. हा बदललेला भारत जुन्या नेत्यानी ओळखणे गरजेचे आहे.

- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली - आपल्या देशातील तरुण पिढी वेगाने बदलत आहे. नवी पिढी नव्या बाबी आत्मसात करीत आहे. हा बदललेला भारत जुन्या नेत्यानी ओळखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी केले.

महाराष्ट्र पत्रकार अधिस्वीकृती समितीने आज मोदी यांची भेट घेऊन 25 मिनिटे चर्चा केली. ते विविध विषयांवर मनमोकळेपणे बोलले. 

पंतप्रधान म्हणाले...

  • नोटाबंदी तथा विमुद्रीकरणामागे अनेक बाबींचा विचार झाला आहे
  • आपणास कॅशलेस व्यवहाराच्या दिशेने जायचे आहे
  • तरुण पिढी वेगाने त्या दिशेने जात आहे
  • 2.5 कोटी रेल्वे प्रवाशांपैकी 50% लोक ऑनलाइन बुकिंग करतात
  • अशी आकडेवारी काही क्षेत्रांची उपलब्ध आहे
     

 

Web Title: recognize changing India- PM Modi