लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांक असा दर्जा देण्याची शिफारस

मल्लिकार्जुन मुगळी 
सोमवार, 19 मार्च 2018

बंगळूर : लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांक असा दर्जा देण्याची शिफारस केंद्राकडे करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. सोमवारी कर्नाटक मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.

बंगळूर : लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांक असा दर्जा देण्याची शिफारस केंद्राकडे करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. सोमवारी कर्नाटक मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.

कर्नाटक अल्पसंख्याक कायदा 2 (डी) अंतर्गत ही शिफारस करण्यात येणार आहे. लिंगायत आणि विरशैव लिंगायत धर्माची शिफारस करण्याचा निर्णयही झाला. लिंगायतांना धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या मागणीसाठी गेल्या सहा महिन्यापासून राज्यभरात आंदोलने होत आहेत. या आंदोलनाना राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी बळ दिले आहे. आता विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राज्यशासनाने धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णय घेऊन लिंगायतांना गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Recommendation of lingayat community want regional minority