नीरवच्या बहिणीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस 

Red Corner Notice against Neerav's sister
Red Corner Notice against Neerav's sister

नवी दिल्ली (पीटीआय) : पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहारप्रकरणातील मुख्य आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी याची बहीण पूर्वी मोदी हिच्याविरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. 

नीरव मोदी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी "पीएनबी'मध्ये सुमारे 2 अब्ज डॉलरचा गैरव्यवहार केला आहे. या प्रकरणात त्याची बहीण पूर्वी (वय 44) आरोपी आहे. तिच्यावर करचुकवेगिरीचा आरोप आहे. तिच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावावी, अशी मागणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) इंटरपोलकडे केली होती. या प्रकरणाचा तपास पुढे नेण्यासाठी तिला पकडणे आवश्‍यक असल्याचे "ईडी'ने म्हटले होते. या प्रकरणी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या पहिल्या आरोपपत्रात तिचे नाव आहे. 

पूर्वी इंग्रजी, गुजरात आणि हिंदी बोलते. ती बेल्जियमची नागरिक आहे, असे इंटरपोलने नोटिशीत म्हटले आहे. एकदा इंटरपोलने नोटीस बजावल्यानंतर संघटनेचे 192 सदस्य देश संबंधित व्यक्ती त्यांच्या भूमीवर आढल्यास तिला अटक करतात अथवा ताब्यात घेतात. त्यानंतर त्या व्यक्तीचे प्रत्यार्पण करण्यात येते. नीरव मोदी याच्या कंपनीचा अधिकारी मिहीर भन्साळ याच्याविरोधातही इंटरपोलने रेड कार्नर नोटीस बजावली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com