लाल गुलाब देऊन मतदान करणाऱ्या महिलांचे स्वागत

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

बडौत - मतदानासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने निवडणूक आयोगाचे अनोखे पाऊल उचलले आहे. येथील मतदान केंद्रावर येणाऱ्या महिला मतदारांना मतदान झाल्यानंतर लाल गुलाब देऊन त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदानास प्रारंभ झाला. उत्तर प्रदेशमधील 15 जिल्ह्यांतील 73 मतदारसंघात आज मतदान होत आहे. यामध्ये 1,17,65,768 महिला मतदार आहेत. बडौत येथील मतदान केंद्रावर मतदानास येणाऱ्या महिलांना लाल रंगाचे गुलाब देऊन त्यांचे स्वागत करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. "मतदानानंतर आम्हाला प्रथमच गुलाब मिळाले', अशा प्रतिक्रिया मतदानानंतर गुलाब स्वीकारणाऱ्या महिला मतदाराने व्यक्त केल्या.

आज 26,823 मतदान केंद्रातून 839 उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रांत सेव्ह होणार आहे.

Web Title: Red roses for women casting vote in Baraut